बऱ्याच दिवसांपासून इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा पाण्याशी संपर्क आल्याने , इथेनॉल पेट्रोलमधून विभक्त होऊन पाण्यासह इंधनाच्या टाकीच्या तळाशी जमा होतो,ज्यामुळे गाडी सुरु होण्यास किंवा चालण्यास असमर्थ होते, अशा आशयाचा फ्लेक्सचं नेरळमधील पेट्रोलपंम्पचालकांनी प्रवेशद्वाराजवळच लावला आहे.
सततच्या तक्रारींमुळे पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यापेक्षा तक्रारी करण्यासाठीच गर्दी जमू लागली आहे, त्यामुळे पेट्रोलपंपचालक हैराण होऊन स्पष्टीकरणाची नोटीसचं लावावी लागली .
अगोदरच पेट्रोलच्या किमतीने हैराण सामान्य जनता आणि प्रामाणिक करदात्या वाहनचालकांना याचा त्रास होतो आहे, इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे प्रदूषणाची पातळी निच्छित कमी होणार असली तरी, सरकारने योग्य ती चाचणी करून अगोदर तिचं मूल्यमापन करणं गरजेचं होतं ,तसेच सरकारप्रमाणे पेट्रोलपंपधारकांना पेट्रोलपंपाबाहेर या सगळ्याची पूर्वकल्पना म्हणून सूचना लावणे त्यांची जबाबदारी होती.
इथेनॉल स्वस्त असल्याकारणाने इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या किमती कमी करण्याची गरज होती. ज्याच्यामुळे सर्व नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.