भेदभाव ! निधी ४० फूट रस्त्यासाठी, रस्ता मात्र फक्त १६ फुटांचं…

नेरळच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्याबाबत भेदभाव !

नेरळ मार्केटमधील बहुचर्चित ४० फूट रस्त्यांसाठी आणि भूमिगत गटारांची केंद्र सरकारकडून ९० टक्के आणि जिल्हा परीषदेकडून १० टक्के निधी देण्यात आला , जिल्हा परिषदेचे माननीय अध्यक्ष मा सुरेशदादा टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली टपरीधारक व नेरळमधील व्यापारी वर्गाबरोबर संयुक्तीतरित्या बैठकी पार पडल्या, त्यात नेरळमधील  टपरीधारकांना प्रस्तावित जागी मार्केटसाठी जागा देण्याचे मान्य केले, मात्र मार्केटचे काम रडतखडतच चालू आहे. त्यानंतर नेरळमधील व्यापारी , जेष्ठ नागरिक व अन्य मान्यवरांबरोबर तसेच नेरळमधील सर्वपक्षीय सदस्यांबरोबर झालेल्या बैठकीत ४० फुटी रस्त्याला अनुमती देण्यात आली, तरीही रस्ता अखेर २० फुटांपेक्षा कमी रुंदीचा बनवला जाणार असून, राजकारण्यांनी गरीब टपरीधारकांच्या पोटावर पाय देऊन कोणावर एवढे मेहरबान झाले आहेत. रस्तावरील अनधिकृत अतिक्रमण केलेल्या टपऱ्या जमीनदोस्त केल्या, दुसऱ्या बाजूने मात्र व्यापाऱ्यांच्या पायऱ्यांना जरा सुद्धा धक्का लावण्यात आला नाही. या राजकारण्यांच्या निर्णयाचा नेरळच्या जनतेकडून तीव्र आक्षेप नोंदवला जात असून टपऱ्या जमीनदोस्त करून काहीएक उपयोग होणार नाही, आणि व्यापाऱ्यांच्या भल्यामोठ्या मालवाहतूक गाड्यांमुळे पुन्हा ट्राफिकची अवस्था जैसे थे चं राहील. अगर टपरीधारकांवरअन्याय झाल्यास नेरळच्या जनतेकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल.

Advertisements

Author: neraltown

Feel free to contact us at https://www.neraltown.WordPress.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s