​रस्ता बनतोय अडथळा !


नेरळमधील खांडा ते जकात नाका हा रस्ता सुरुवातीपासूच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. कधी त्याच्या रुंदीकरणासाठी दुसऱ्या बाजूला असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमीन संपादनासाठी होणाऱ्या विरोधामुळे तर कधी अडथळे ठरणाऱ्या अतिक्रमित टपऱ्या तोडून पुरेसे रुंदीकरण होत नसल्यामुळे. त्यातच रस्ता रुंदीकरण एका  बाजूने पूर्ण झाला आहे परंतु रस्त्याच्या मध्ये असणारे महाराष्ट्र  स्टेटइलेक्ट्रिसिटी बोर्डाचे पोल कलंडण्याच्या स्थितीत आहेत मात्र ते हटवण्याची, बदलण्याची अथवा बाजूला घेण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे रस्ता होऊन त्याला काहीएक अर्थ राहणार नाही आणि करोडो रुपयांचा चुराडा होईल, नेरळच्या विकासाचे स्वप्न पाहिलेल्या नेरळच्या जनतेचा पूर्णपणे अपेक्षाभंग होईल. वरून तर वरून नेरळच्या जनतेने रस्ता तयार  होताना सोसलेल्या त्रासाची परिणीती तुम्हाला पुढे येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मतदानातून नक्कीच दिसेल. तेव्हा केंद्र सरकारकडून आलेल्या ९० टक्के आणि जिल्हा परिषदेकडून घेतलेल्या १० टक्के निधीचा पूर्ण क्षमतेने वापर करून, टपरीधानकांवर अन्याय न होऊ देता दुसऱ्या बाजूने कायदेशीररित्या योग्य पद्धतीने जमीन संपादित करून  ४० फूट रस्ता तयार करावा हि समस्त नेरळकरांकडून कळकळीची माफक अपेक्षा.
“केंद्र सरकारकडून आलेल्या जीआर नुसार नेरळ ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या हस्तक्षेपाने विनाअडथळा दोन्ही बाजूने कायदेशीररित्या नोटीस  देऊन दुकाने खाली करून ४० फूट रस्ता तयार होऊ शकतो. मात्र राजकारण्यांच्या लागेबांधे आणि इच्छाशक्तीअभावी नेरळसारख्या माथेरानच्या पायथ्याशी असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीकडून नेरळ शहराचे विद्रुपीकरण चालू आहे आणि पुढेही चालू राहणार”.

Advertisements

Author: neraltown

Feel free to contact us at https://www.neraltown.WordPress.com

2 thoughts on “​रस्ता बनतोय अडथळा !”

  1. Rasta Banwanya sathi je adthara aanat aahet tyana samjavnuk ghalun. Ak sarkari complex banaun dya. Thithe dukhananchi nilami kara aani kahi bhadya ni dya. Karan aaj mala 27 vesrh zale neral cha rasta tasacha tasach aahe. Aata vel aali aahe ki neral la pan Green and clean city banawanya cha.. Zar maj kahi chukal asel suggestion detana tar mana pasun mafi

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s