​धुळीच्या विळख्यात नेरळकरांची घुसमट…

वर्षानुवर्षे रस्त्यांची खालावलेली परिस्थिती जशी नेरळसारख्या रायगड जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत म्हणून गणली गेलेल्या आणि ४० फूट रस्त्याची रुंदी १६ फुटांवर आणल्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीची रायगड  जिल्ह्यात जी नाचक्की होत आहे त्याला तोड नाही. नेरळमधील नागरिकांकडून याविषयी विरोधातील अत्यंत तीव्र सूर व्यक्त होत आहे.

रस्त्याच्या हलक्या प्रतीच्या कामामुळे नेरळकरांना धुळीचा जबरदस्त सामना करावा लागत आहे. धुळीच्या साम्राज्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . शहरातील कित्येक भागात धुळीचे प्रमाण वाढलेले आहे. साई मंदिर, नेरळमधील संपूर्ण बाजारपेठ, हेटकर आळी इत्यादी भागात भरपूर प्रमाणात धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे . या ठिकाणी श्वसनाला अडथळा आणणारे बारीक क ण  हवेत मोठ्या प्रमाणात आहेत . 

स्वतःला  तोलामोलाचे, अतिउत्साही आणि समाजाचे भले करण्याचा आव आणणारे तथाकथित भ्रष्ट नेते मंडळी आळीपाळीने आपली टर्म पूर्ण  करण्यात आणि पक्ष बदलण्याच्या नादात नेरळच्या  विकासाकडे कानाडोळा केला आहे. परिणामी निराळाच  विकास सोडाच पण पार दुर्दशा करून ठेवली आहे.
शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही चांगले रस्ते सोडले तरी त्यातील खड्डे आणि योग्य त्या  मापात , नियमात नसलेल्या गतिरोधकामुळे जीव मेटाकुटीला येतो. पक्क्या रस्त्यांची वानवाच आहे. नेरळमधील कच्चे रस्ते आणि बाजारपेठेतील  पूर्ण झालेला काँक्रीटच्या रस्त्याचा एक पट्टा वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे दुचाकी , चारचाकी तसेच व्यापाऱ्यांच्या मालवतुकीच्या गाड्यांच्या वर्दळीमुळे खूप धूळ उडते . धुळीचे क ण  श्वासोच्छद्वारामुळे शरीरात गेल्यास अस्थमासारख्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. प्रदूषणाचे प्रमाण वेगाने वाढत असून हि बाब नागरिकांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. 
नेरळ बाजार पेठेत फिरताना तोंडाला मास्क लावणे अथवा स्कार्फ बांधून जाणे अनिवार्य आहे. सर्व स्तरातील नागरिकांना या गंभीर बाबीची तीव्रता जाणवत आहे . प्रदूषणामुळे आरोग्यावर दीर्घकालीन गंभीर परिणाम होतात , हे डॉक्टरांनी सांगितल्यावरच संबंधित व्यक्ती काळजी घेते अन्यथा नागरिक उपाययोजना ना करताच वावरत असतात.
नेरळच्या स्थानिक नेत्यांनी आतातरी स्वतःची जबादारी मानून वाढत्या प्रदूषणाच्या बाबतीत जागरूकता निर्माण करून यावर त्वरित उपाययोजना करावी हि कळकळीची विनंती.

Advertisements

Author: neraltown

Feel free to contact us at https://www.neraltown.WordPress.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s