डम्पिंगच्या धुराने नेरळकरांचे आरोग्य धोक्यात.

नेरळ शहरातील लोकसंख्या वाढत चालली तसे कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जागेअभावी मर्यादा येऊ लागल्या. आणि सुरु झाला डम्पिंगचा प्रश्न. नेरळ पच्छिमेचा भाग मोठा असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात कचरा गोळा होतो. त्यात बाजारपेठेतील कचऱ्याचे प्रमाण खूप जास्त असते. ओला सुका कचरा एकत्र डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो. त्यामध्ये प्रत्येकदिवशी खराब झालेल्या भाज्या, मच्छी, मटन, चिकन यांसारखे  टाकाऊ पदार्थ, व्यापाऱ्यांच्या किराणामालाच्या दुकानातील कचरा मोठ्या प्रमाणात असतो. विशेषतः मच्छी, मटन, चिकन यांसारखे  टाकाऊ पदार्थांसाठी कोणतीही अन्य प्रक्रिया करण्यात येत नाही. उलट कचरा टाकण्याच्या डम्पिंग ग्राउंड मध्येच ते घटक टाकले  जातात. डम्पिंग ग्राउंड शास्त्रशुद्ध पद्धतीने न हाताळता तेथील कचरा जाळला जातो. डम्पिंग ग्राउंड मेन हायवेलगत असल्याने आग दिवसरात्र धुमसतच असते. त्याचा त्रास आसपास राहणाऱ्या रहिवाश्यांना, दुकानदारांना, प्रवास करणाऱ्या लोकांना होतो. डम्पिंग  ग्राउंडच्या समोर उच्च्भ्रू लोकांची वस्ती असून तुलसी इस्टेट आणि राजेंद्र गुरु नगरमधील लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मच्छी, मटन, चिकन यांसारखे  टाकाऊ पदार्थांच्या सडण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भरपूर प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. अश्या दुर्गंधीयुक्त सततच्या त्रासामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यासंबंधी तक्रारी वाढू शकतात, त्यांना गंभीर श्वसनाचे त्रास होऊ शकतात. तेव्हा नेरळ ग्रामपंचायतीने योग्य ती पावले उचलून उत्तम नियोजनाने भरवस्तीतला डम्पिंग ग्राउंड बंद करून अन्यत्र हलवावं हि विनंती.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s