नेरळकरांच्या तोंडाला पुसली पाने !

केंद्र सरकारकडून आलेल्या ६० फुटी रस्त्यासाठी (प्रस्तावित नगरपालिका, नगरपरिषदसाठी आणि ४० फूट ग्रामपंचायतीसाठी) निधी योग्य वापर न करताच जो घोडेबाजार चालू आहे, त्याविरोधात गुरुवार २३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता धारप सभागृहात आम्ही नेरळकरांच्या वतीने समस्त नेरळकरांसाठी सभेचे आयोजन केले आहे. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती नोंदवून चाललेल्या घोडेबाजाराला लगाम लावावा.

सदर रस्त्याच्या कामाला विलंब होत असून पूर्ण तीन महिने होत आले तरीसुद्धा अर्धा टप्पा पूर्ण व्हायला नाकीनऊ आले आहेत (नेरळ रेल्वे स्टेशन ते वीर छत्रपती शिवाजी महाराज चौक हा अर्धा टप्पा) कामाची मुदत फक्त एक वर्षाची असून त्यामध्ये वीर छत्रपती शिवाजी महाराज चौक-अंबिका भुवन नाका- जकात नाका, जुनी बाजारपेठ , कुंभार आळी , लोकमान्य टिळक रस्ता (श्री हनुमान मंदिर ते राजमाता जिजाबाई भोसले तलाव रस्ता) नेरळ-कळंब रस्ता, श्री साई मंदिर ते दामात रस्ता इत्यादी कामे बाकी आहेत, ती होणार कधी याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सदर पहिल्या अर्ध्या टप्प्याचे काम निकृष्ट असून, रस्त्यात असणारे पोल काढण्याची तसदी घेतलेली नाही. व जे जीर्ण पोल बदलण्यात आले आहेत, ते पुन्हा बाजूला न घेता त्याच जागी लावण्यात आले आहेत. टेलेफोन च्या खांबांची तर बोंबाबोंबाच आहे. त्यामुळे रस्ता अजूनच अरुंद होत असून, ही एम एम आर डी ए च्या कोणत्या प्रकारच्या कामाची पद्धत आहे. हा नेरळकरांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे.

  • रस्त्याच्या निधीवरून श्रेय घेणारे बॅनरबाजी करणारे पुढारी कुठे गेले? सुरुवातीला आवाज उठवणारे स्थानिक गाववाले पर्यायाने मराठा समाज आता गप्पा का? आम्ही नेरळकरांनी ठरवलेल्या या अभूतपूर्व मीटिंगमध्ये मराठा समाज सहभागी आहे का? जर असेल तर मराठा समाजाने हे आवाहन का केले नाही? ह्या सर्वांची उत्तरे आपल्याला २३ मार्चला सायंकाळी ठीक ७ वाजता, धारप सभागृहात मिळू शकतील, तेव्हा प्रत्येक नेरळकरची उपस्थिती महत्वपूर्ण आहे.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s