नेरळ बाजार पेठ बंद ! बंद ! बंद !

आज दुपारी अकरा वाजेनंतर नेरळ ग्रामपंचायतीने बेकायदा शेड उभारणी आणि हातगाडी , बाकडे लावून फुटपाथ वर व्यवसाय कारणेंविरोधात कारवाई केली. सदरहून स्थानिक सोडून बाहेरील व्यक्ती नेरळ बाजारपेठेत धंदा करण्यासाठी येतात , पण प्रशासनाला ना जुमानता दादागिरीची भाषा करू लागली आहेत. त्यांच्यावर प्रशासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही. वाटेल तेव्हा आपलं राज्य चालणार या अविर्भावात ते आहेत. त्यात मटन मच्छी विक्रेते मेन बाजार पेठेत पुन्हा धंदा करण्यास उत्सुक आहेत. त्यांना साथ लाभते ती नावापुरती असलेली आणि कोणतीही भक्कम आधार नसलेली आणि होतंय म्हणून चाललंय अश्या कोण्या एका स्वतःला अध्यक्ष म्हणवून घेणारया राजकारणापासून कोसो दूर असणाऱ्या व्यक्तीची.

असो , पण बाहेरील व्यक्तीमुळे आज स्थानिक बेरोजगार आणि हातावर पोट असणाऱ्यांच्या पोटावर आज पुन्हा पाय दिला गेलाय.

सदर , आजच्या पोलीस कारवाईत सर्वांना हातगाडी बाकडे काढून व्यवसाय करण्याची परवानगी दिली होती, पण सर्वजण बाकडे, हातगाड्या काढून टाकत असताना एका बाहेरील विक्रेत्याने बाकडे काढण्यास नकार दिला आणि माझ्याकडे कर्जत तालुक्याचे विक्री व्यवसाय करण्याचा परवाना आहे, मी येथून हलणार नाही, तेव्हा पंचायतीच्या माणसाने एका सदस्याला फोन लावून कळवले असता , समोरून सर्वांना उठवण्याचे आदेश दिला .
या कारवाईत रस्त्यावर लावलेल्या दुचाकी सुद्धा उचलण्यात आल्या.

Advertisements

डम्पिंगच्या धुराने नेरळकरांचे आरोग्य धोक्यात.

नेरळ शहरातील लोकसंख्या वाढत चालली तसे कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जागेअभावी मर्यादा येऊ लागल्या. आणि सुरु झाला डम्पिंगचा प्रश्न. नेरळ पच्छिमेचा भाग मोठा असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात कचरा गोळा होतो. त्यात बाजारपेठेतील कचऱ्याचे प्रमाण खूप जास्त असते. ओला सुका कचरा एकत्र डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो. त्यामध्ये प्रत्येकदिवशी खराब झालेल्या भाज्या, मच्छी, मटन, चिकन यांसारखे  टाकाऊ पदार्थ, व्यापाऱ्यांच्या किराणामालाच्या दुकानातील कचरा मोठ्या प्रमाणात असतो. विशेषतः मच्छी, मटन, चिकन यांसारखे  टाकाऊ पदार्थांसाठी कोणतीही अन्य प्रक्रिया करण्यात येत नाही. उलट कचरा टाकण्याच्या डम्पिंग ग्राउंड मध्येच ते घटक टाकले  जातात. डम्पिंग ग्राउंड शास्त्रशुद्ध पद्धतीने न हाताळता तेथील कचरा जाळला जातो. डम्पिंग ग्राउंड मेन हायवेलगत असल्याने आग दिवसरात्र धुमसतच असते. त्याचा त्रास आसपास राहणाऱ्या रहिवाश्यांना, दुकानदारांना, प्रवास करणाऱ्या लोकांना होतो. डम्पिंग  ग्राउंडच्या समोर उच्च्भ्रू लोकांची वस्ती असून तुलसी इस्टेट आणि राजेंद्र गुरु नगरमधील लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मच्छी, मटन, चिकन यांसारखे  टाकाऊ पदार्थांच्या सडण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भरपूर प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. अश्या दुर्गंधीयुक्त सततच्या त्रासामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यासंबंधी तक्रारी वाढू शकतात, त्यांना गंभीर श्वसनाचे त्रास होऊ शकतात. तेव्हा नेरळ ग्रामपंचायतीने योग्य ती पावले उचलून उत्तम नियोजनाने भरवस्तीतला डम्पिंग ग्राउंड बंद करून अन्यत्र हलवावं हि विनंती.