​नेरळमधील देशी दारूचे दुकान बार आणि वाईन शॉप बंद !

कोर्टाने  दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी अखेर संपूर्ण महाराष्ट्रभर १ एप्रिल पासून लागू झाली. त्यानुसार हायवेपासून सर्व प्रकारच्या मद्याची दुकाने, बार आणि वाईन शॉप ५०० मीटरच्या अंतरावर हवीत . 
सद्यस्थितीत हायवेलागत असणाऱ्या मद्यविक्रीच्या दुकानांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीव गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात मद्यधुंद  अवस्थेत गाड्या चालवून स्वतःसह इतर निरपराधी सुद्धा बळी पडत आहेत.
नेरळच्या मुख्य हायवे (SH 35) लागत असणारी मद्यविक्रीची दुकाने, बियर बार तसेच वाईन शॉप १ एप्रिल बंद होते. तसेच नेरळ बाजारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा मुख्य रास्ता नेरळ-माथेरान हायवे मध्ये मोडत असल्याने स्टेशनलगत असलेली सर्व मद्याची दुकाने कायमची बंद झाली आहेत.

Advertisements